ई श्रम कार्ड धारक ला अपघाती मृत्यू किंवा कायम अपंगत्व आल्यास 2 लाख व अंशतः अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये विमा मिळणारं आहे.
अर्ज कसा करावा याची संपूर्ण सविस्तर माहिती दिली आहे
असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सरकारने ई श्रम कार्ड विमा योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे असंघटित कामगारांना विमा प्रधान करणे हा आहे.
ई श्रम कार्ड चे भरपूर फायदे आहेत , जसे की पेन्शन योजना, विमा योजना , म्हणून जे असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार आहेत त्यांनी ई श्रम कार्ड काढणे फायद्याचे आहे.
आज आपण ई श्रम कार्ड विमा योजनेबद्दल माहिती घेणार आहोत.
1. विमा योजना माहिती.
2. विमा कोणाला मिळणार?
3. विमा कसा मिळणारं.
ई श्रम कार्ड विमा योजना
प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत ई श्रम कार्ड धारकला 2 लाखाचा विमा मिळणारं आहे.
अधिक समजून घेऊया की हा विमा फक्त अपघाती मृत्यू नंतरचं व अपघाती कायम अपंगत्व आले तरच मिळणारं आहे.
अणि अपघातामध्ये अशंता अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये विमा मिळणारं आहे.
म्हणजे नैसर्गिक मृत्यू झाला तर हा विमा मिळणारं नाही.
विमा कोणाला मिळणार
प्रत्येक ई श्रम कार्ड धारकला अपघाती मृत्यू किंवा कायम अपंगत्व आल्यास 2 लाखाचा विमा मिळणारं तसेच अंशतः अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये विमा मिळणारं आहे.
ई श्रम कार्ड असंघटित कामगारांना विमा प्रधान करते म्हणजे जे EPFO व ESIC मेंबर आहेत त्यांना ई श्रम कार्ड विमा योजना मिळणारं नाही , कारण ESIC मध्ये त्यांना ही योजना लागू असते.
विमा कसा मिळणारं
ज्या ई श्रम कार्ड धारकांचा अपघाती मृत्यू झाला असल्यास त्याला प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत लाभ मिळणार.
त्यासाठी ई श्रम कार्ड वर नोंद असलेल्या वारसदार ला विम्याची रक्कम दिली जाईल.
अजुन ई श्रम कार्ड पोर्टल वर ऑनलाईन क्लेम ची सुविधा नसली तरी आपण त्यांचा हेल्प लाईन नंबर 14434 वर फोन करून तात्काळ विमा धारकांची माहिती देऊ शकता. त्यांना प्रतिनिधी सर्व कागदपत्राची पाठपुरावा करून क्लेम प्रोसेस पूर्ण करून घेईल.
तसेच पोर्टल वरील grievance या प्रयाया वर क्लिक करून क्लेम बद्दल ची आवश्यक माहिती भरू शकता.
हेल्प लाईन नंबर - 14434
वरील लिंक वर क्लिक करून त्यामध्ये Lodge Grievance वर क्लिक करून आपण क्लेम बद्दल ची सर्व माहिती भरू शकता.
...................
ई श्रम कार्ड विमा योजना
मिळणारा लाभ ?
2 लाख रुपये
कोणाला मिळणार ?
ई श्रम कार्ड धारकास
कधी मिळणार?
अपघाती मृत्यू किंवा कायम अपंगत्व आल्यास व अंशतः अपंगत्व आल्यास
किती विमा मिळणारं?
अपघाती मृत्यू किंवा कायम अपंगत्व आल्यास 2 लाख व अंशतः अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये
विमा कसा मिळणारं?
हेल्प लाईन नंबर 14434 वर कॉल करून किंवा पोर्टल वरील grievance या प्रयाया वर क्लिक करून क्लेम बद्दल ची आवश्यक माहिती भरू शकता.
ई श्रम कार्ड कसे काढावे
प्रथम www.eshram.gov.in या वेबसाईट वर जाऊन register on E shram वर क्लिक करावे , येथे आधार OTP द्वारे आपण registration करू शकतो किंवा जवळील CSC सेंटर वर जाऊन बायोमेट्रिक द्वारे ही registration करू शकतो.
ई श्रम कार्ड साठी आवश्यक कागदपत्रे
1. आधार कार्ड
2. बँक पासबुक
3. वारसदार ची माहिती (नाव, जन्म तारीख)
4. आधार रजिस्टर मोबाईल


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा