डिजीटल मराठी मध्ये आपल स्वागत आहे.
आज आपण आपल्या पी.एफ ला (EPFO) वारसदार (ई-नॉमोनेशन E-Nomination) कसे लावायचे याची माहीती घेणार आहोत.
Steps-
1. सर्व प्रथम epfindia.gov.in या वेबसाईट वर जाऊन , Services या मेंनूबार मध्ये For Employees या सबमेनुवार क्लिक करावे.त्या मध्ये Membar UAN वर क्लिक करावे.
2 आता आपल्या समोर पुढील प्रमाणे एक नवीन पेज ओपन होईल , त्यामध्ये आपल्याला आपला UAN आणि Password टाकावा व कॅपचा कोड टाकूण आपले खाते ओपन करावे.
3. आपले पोर्टल ओपेन झालेनंतर वारसदार लावण्यासाठी सर्व प्रथम VIEW या मेनूवर क्लिक करून आपले Profile अपडेट करून घ्यावे. त्यातील आपला फ़ोटो , पत्ता अपडेट करून द्यावा . कारण ते केल्या शिवाय E-Nomination चा ऑप्शन ओपनच होणार नाही, पुढील स्क्रीनशॉट मध्ये दाखवले आहे.
4. आता Manage या मेनू वर क्लिक करून E - Nomination या मेनूवर क्लिक करा. पुढे आपले पुर्ण Profile दिसेल Proced वर क्लिक करून E - Nomination चे पेज ओपन होईल, त्यामध्ये Having Family ऑप्शन पुढे YES असे क्लिक करावे. पुढे वारसदार चे आधार नंबर , नाव, जन्मतारीख, जेंडर, रिलेशन, पत्ता भरून फोटो अपलोड करा व save Family Details वर क्लिक करावे. पुढील स्क्रीनशॉट मध्ये दाखवले आहे.
5. वारसदार ची माहीती SAVE झाल्यानंतर ADD NEW वर क्लिक करून दुसर्या वारसदारची माहीती हीभरू शकतो, सर्व वारसदार ची माहीती भरून झाल्यानंतर, टिक बॉक्स मध्ये क्लिक करून १०० % टक्के शेअर्स ची विभागणी करावी, म्हणजे १००% वारसदार शेअर्स मध्ये आपण ५०,५० टक्के दोन वारसदार ना विभागू शकतो, म्हणजे आपल्या पश्यात वासदार ना फंडाची रक्कम तसेच पेंशन मिळेल.
6. SAVE Nomination वर क्लिक केल्यानंतर पुढे एक पेज ओपन होईल, हे पेज आधार वेरिफिकेशन म्हणजे E-Sign चे असेल, या मध्ये पीएफ मेंबर चा आधार नंबर टाकून GET OTP वर क्लिक करावे. OTP टाकल्या नंतर आपले नॉमिनेशन पुर्ण होईल ,
पुढील स्क्रीनशॉट मध्ये दाखवले आहे.






टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा