मुख्य सामग्रीवर वगळा

गडचिरोली पोलीस दलात 136 रिक्त जागांसाठी भरती



 गडचिरोली पोलीस दलात 136 रिक्त जागांसाठी भरती होत आहे.  पात्र उमेदवाराकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. बारावी पास व हलके वाहन चालक L.M.V परवाना असलेल्या उमेदवारांना ही सुवर्णसंधी आहे. 

महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियम 2011 तसेच त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा व शासन निर्णयाच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक गडचिरोली आस्थापनेवरील दिनांक 31 /12 /2020 रोजी असलेली 136 रिक्त पदे भरण्याकरता पोलीस शिपाई पदांची भरती आयोजित करण्यात येत आहे.


पदाचे नाव: -  पोलीस शिपाई


कॅटेगरी नुसार रिक्त असलेली पदे पुढीलप्रमाणे




टीप : -  वर दर्शविण्यात आलेल्या रिक्त पदांमधून अनाथ उमेदवारांकरिता 1% म्हणजेच एक पद उपलब्ध असेल. कागदपत्रे तपासणी निवड यादी तयार करताना अनाथ उमेदवार ज्या प्रवर्गातील असेल त्या सामाजिक प्रवर्गाच्या सर्वसाधारण समांतर आरक्षण मधून कमी करण्यात येईल.


शैक्षणिक पात्रता  : - बारावी उत्तीर्ण आणि हलके वाहन चालक परवाना

(महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 मधील नियम 3(१) नुसार पोलीस शिपाई पदाच्या भरती मध्ये पोलीस शिपाई पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मोटार वाहन अधिनियम, नियम 1988 मधील कलम 2( 21) नुसार हलकी वाहने चालविण्याचा परवाना धारण केला असणे आवश्यक आहे.  परंतु सदर परवाना धारण करणाऱ्या उमेदवाराने नियुक्ती नंतर त्यांचे पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर दोन वर्षाच्या आत परवाना धारण करण्यात येईल, व त्या कालावधीत हा परवाना धारण  न केल्यास निवड रद्द करून सेवा समाप्त करण्यात येईल याबाबतचे बंध पत्र सादर केल्यास उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहील)


शारीरिक पात्रता

पुरुष - उंची 165 सेंटिमीटर पेक्षा कमी नसावी

          छाती न पुगवता 79 सेंमी पेक्षा कमी नसावी

महिला- उंची 155 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी


नोकरीचे ठिकाण: गडचिरोली

फी - खुला प्रवर्ग 450 रुपये

       मागास प्रवर्ग 350 रुपये



अर्ज कसा करावा

गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय ,पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय गडचिरोली व पोलीस मुख्यालय प्राणहिता येथे अर्ज मिळतील तसेच पोलीस अधिक्षक गडचिरोली यांचे संकेतस्ळावरून www.gadchirolipolice.gov.in व www.mahapolice.gov.in एप्लीकेशन अर्ज डाऊनलोड करता येतील.

ऍप्लिकेशन अर्ज दिनांक 21/05/2022 पासून उपलब्ध होतील तसेच 05/06/2022 गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय गडचिरोली पोलीस मुख्यालय प्राणहिता येथे आवश्यक ती  फ़ी भरून स्वीकारण्यात येतील.


अर्ज करण्याची शेवटची तारीख  :-05/06/2022


अर्ज करण्याची पद्धत :

अर्ज डाऊनलोड करून  त्याची प्रिंट काढावी व आवश्यक माहिती भरून त्यावर उमेदवाराने स्वतःचा अद्यावत म्हणजे लेटेस्ट फोटो जोडावा (उमेदवाराने अर्जावर जोडावयाचा फोटो हा डोक्यावर कोणत्याही प्रकारची टोपी न घालता काढलेला असावा कोणत्याही प्रकारची टोपी न घालता व चेहरा स्पष्ट करता येईल असा असावा प्रवेश पत्रावर अर्जावर दुसऱ्याचा फोटो सही असल्यास सदर उमेदवारास भरती ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही. आवेदन अर्ज भरतेवेळी सादर केलेल्या फोटोच्या प्रति भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात सादर करणे अनिवार्य राहील त्या अर्थाने कमीत कमी 10 फोटो प्रति स्वतः जवळ ठेवणे आवश्यक आहे.


लेखी परीक्षा

पोलीस शिपाई पदासाठी आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची प्रथम लेखी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येईल. लेखी परीक्षेसाठी देण्यात आलेल्या प्रवेश पत्र मध नमूद केलेल्या दिनांकास परीक्षा सुरू होण्यापूर्वी परीक्षा केंद्रावर किमान दोन तास आधी उपस्थित राहावे लागेल. सदर लेखी परीक्षा होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारास 35 टक्के व मागास प्रवर्गातील उमेदवारास 32 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.

लेखी चाचणी चा कालावधी 90 मिनिटांचा असेल व मराठी भाषेत देण्यात येईल सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे जातील चुकीच्या उत्तरासाठी गुण कपात करण्यात येणार नाही. निगेटिव्ह मार्किंग नाही.


जाहिरात पहा



नवीन सरकारी नोकरीच्या जाहीराती साठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा


टिप्पण्या

महत्वाच्या भरती

भारतीय वायूसेना अग्निवीरवायु (Non-Combatant) भरती 2026 – संपूर्ण माहिती

  भारतीय वायूसेनेत Agniveervayu Non-Combatant पदासाठी 02/2026 बॅचची भरती जाहीर झाली आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत ही भरती 4 वर्षांच्या कालावधीसाठी केली जाते. खाली या भरतीची महत्त्वाची माहिती दिली आहे. पदाचे नाव अग्निवीरवायु (Non-Combatant) अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 फेब्रुवारी 2026 पात्रता (Eligibility) वय मर्यादा जन्म तारीख: 02 जुलै 2005 ते 02 जानेवारी 2009 (दोन्ही दिवस धरून) वैवाहिक स्थिती फक्त अविवाहित पुरुष उमेदवार पात्र 4 वर्षांच्या सेवाकाळात लग्न करता येणार नाही शैक्षणिक पात्रता 10वी (Matriculation) पास – मान्यताप्राप्त बोर्डातून शारीरिक व वैद्यकीय निकष किमान उंची: 152 सेमी छाती विस्तार: किमान 5 सेमी दृष्टी: 6/36 (Correctable to 6/9) LASIK/PRK शस्त्रक्रिया मान्य नाही ऐकण्याची क्षमता सामान्य असावी शरीर पूर्णपणे निरोगी असणे आवश्यक नोकरीचे काम (Job Profile) 1. Hospitality Stream स्वयंपाक, किचन व्यवस्थापन अन्न साठवण, सर्व्हिंग, स्वच्छता 2. Housekeeping Stream साफसफाई, बागकाम, पाणी भरणे कपडे इस्त्री, शू पॉलिश, छोटे दुरुस्ती काम अर्ज करण्याची प्रक्रिया अर्ज फॉर्म डाउनलोड करण्यासाठी य...

📮 इंडिया पोस्ट GDS भरती 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी

भारत सरकारच्या डाक विभाग (India Post) मार्फत Gramin Dak Sevak (GDS) भरती 2026 ची अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत 10वी पास उमेदवारांना परीक्षा न देता सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे. 28000+  जागांसाठी ही भरती असणार आहे  ही भरती संपूर्ण भारतभर विविध राज्यांमध्ये होणार असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 🏛️ भरती विभाग India Post – Department of Posts, Government of India 📌 भरतीचे नाव Gramin Dak Sevak (GDS) Recruitment 2026 📍 पदांचे नाव Branch Postmaster (BPM) Assistant Branch Postmaster (ABPM) Dak Sevak 🗓️ महत्वाच्या तारखा One Time Registration: 31 जानेवारी 2026 ते 14 फेब्रुवारी 2026 ऑनलाईन अर्ज व फी भरणे: 02 फेब्रुवारी 2026 ते 16 फेब्रुवारी 2026 Correction / Edit Window: 18 व 19 फेब्रुवारी 2026 🎓 शैक्षणिक पात्रता उमेदवार 10 वी (SSC) उत्तीर्ण असावा गणित व इंग्रजी विषय उत्तीर्ण असणे आवश्यक संबंधित राज्याची स्थानिक भाषा 10 वीपर्यंत शिकलेली असावी 🎂 वयोमर्यादा किमान वय: 18 वर्षे कमाल वय: 40 वर्षे 🎯 वय सवलत SC/ST – 5 वर्षे OBC –...

🚆RRB Group D भरती 2026

  🚆 RRB Group D भरती 2026 | CEN No. 09/2025 भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! Railway Recruitment Board (RRB) मार्फत Group D (Level–1) पदांसाठी CEN No. 09/2025 अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे देशभरात विविध रेल्वे झोनमध्ये एकूण 22,195 पदे भरली जाणार आहेत. 🔔 भरतीचा थोडक्यात आढावा भरती संस्था: Railway Recruitment Board (RRB) जाहिरात क्रमांक: CEN No. 09/2025 पदाचा स्तर: Level–1 (Group D) एकूण पदे: 22,195 पगार: ₹18,000/- (7th CPC Pay Matrix) नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 📅 महत्वाच्या तारखा 🟢 अर्ज सुरू: 31 जानेवारी 2026 🔴 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 मार्च 2026 (23:59) 💳 अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2026 ✏️ अर्ज दुरुस्ती कालावधी: 05 मार्च ते 14 मार्च 2026 🧑‍🦯 Scribe तपशील भरण्याची तारीख: 15 मार्च ते 19 मार्च 2026 🎓 शैक्षणिक पात्रता उमेदवार 10वी पास / ITI / Act Apprentice असणे आवश्यक आहे (पदानुसार). अंतिम निकाल लागलेला असणे आवश्यक आहे. Final Result प्रतीक्षेत असलेले उमेदवार अपात्र ठ...

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025 – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025 – संपूर्ण माहिती --- प्रस्तावना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) ही राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्त होण्यासाठी आवश्यक असलेली एक पात्रता परीक्षा आहे. ही परीक्षा केंद्र व राज्य सरकारच्या नियमावलीनुसार आयोजित केली जाते. सन 2025 मधील MAHATET परीक्षा संदर्भातील सर्व तपशील या लेखामध्ये दिलेले आहेत. --- 1. MAHATET म्हणजे काय? MAHATET (Maharashtra Teacher Eligibility Test) ही परीक्षा राज्यातील प्राथमिक (इ. १ ली ते ५ वी) आणि उच्च प्राथमिक (इ. ६ वी ते ८ वी) शिक्षक पदासाठी पात्रता मिळविण्यासाठी घेण्यात येते. शिक्षक पदासाठी अर्ज करण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. --- 2. परीक्षेचे आयोजन आयोजक संस्था: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे परीक्षेची तारीख: रविवार, 23 नोव्हेंबर 2025 पेपर I वेळ: सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 पेपर II वेळ: दुपारी 2.30 ते सायं 5.00 --- 3. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरुवात: 15 सप्टेंबर 2025 शेवटची तारीख: 3 ऑक्टोबर 2025 अर्ज कस...

NAPS Apprentice Registration 2025 – आवश्यक कागदपत्रे व संपूर्ण माहिती

  🛠️ NAPS Apprentice Registration 2025 – संपूर्ण माहिती 📌 प्रस्तावना भारत सरकारने युवकांना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात म्हणून राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना (NAPS) सुरू केली आहे. या योजनेतून विविध उद्योगांमध्ये उमेदवारांना Apprentice म्हणून प्रशिक्षण दिले जाते. उमेदवार शिकत असताना त्यांना मानधन (स्टायपेंड) देखील दिले जाते. --- 📑 नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे 1. आधार कार्ड 2. मोबाईल नंबर (OTP पडताळणीसाठी) 3. ई-मेल आयडी 4. पासपोर्ट साईज फोटो 5. सही / डिजिटल सिग्नेचर 6. बँक पासबुक / खाते तपशील (Aadhaar लिंक खाते) 7. शैक्षणिक प्रमाणपत्रे (10वी / 12वी / ITI / Diploma / Degree) 8. रहिवासी प्रमाणपत्र (काही प्रकरणांत आवश्यक) --- 👨‍🎓 पात्रता अटी उमेदवार भारतीय नागरिक असावा किमान वय: 14 वर्षे कमाल वय: ट्रेडनुसार बदलते शैक्षणिक पात्रता: काही ट्रेडसाठी 8वी उत्तीर्ण बहुतांशसाठी 10वी / 12वी उत्तीर्ण तांत्रिक (Technical) ट्रेडसाठी ITI / Diploma / Degree आवश्यक उमेदवाराकडे Aadhaar-लिंक बँक खाते असणे बंधनकारक --- 💰 स्टायपेंड (मानधन) Apprentice ला मासिक मानधन (स्टायप...