जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर यांचे अधिपत्याखालील असलेल्या महासैनिक हॉल , कोल्हापूर करिता भरती.
पद , पद संख्या, शैक्षणिक पात्रता पुढीप्रमाणे.
1. लिपिक - यासाठी MSCIT मराठी व इंग्रजी टायपिंग उत्तीर्ण असणे आवश्यक यासाठी पगार 13600 रु असणारं आहे. यासाठी 1 जागा रिक्त आहे.
2. विजतंत्री - यासाठी शैक्षणिक पात्रता विद्युत शाखेतील आय. टी.आय कोर्स पास असावा. पगार 13500 रू असणारं आहे. यासाठी 1 जागा रिक्त आहे.
3. वाहन चालक - वाहन चालवण्याचा RTO परवाना आवश्यक. पगार 13500 रू असणारं आहे. यासाठी 1 जागा रिक्त आहे.
4. सफाई कर्मचारी महिला - यासाठी शैक्षणिक पात्रता जाहिराती मध्ये प्रसिध्द केलीली नाही. पगार 13000 रू असणारं आहे. यासाठी 2 जागा रिक्त आहे.
5. सफाई कर्मचारी पुरुष - यासाठी शैक्षणिक पात्रता जाहिराती मध्ये प्रसिध्द केलीली नाही. पगार 13000 रू असणारं आहे. यासाठी 2 जागा रिक्त आहे.
अर्ज कसा करावा :
इच्छुक उमेदवारांनी आपला लेखी अर्ज अन्य आवश्यक कागदपत्र सह दिनांक 31 मे 2022 पर्यंत हजर करावा.
अर्ज सादर करण्याचा पत्ता :
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर येथे दिनांक 31 मे 2022 पर्यंत सादर करणे.
निवड कशी होईल :
प्राप्त सर्व अर्जाची छाननी होऊन उमेदवारांची मुलाखत शुक्रवार दिनांक 10 जून 2022 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर येथे सकाळी 10 वाजता घेण्यात येईल.
उमेदवार निवडीचे किंवा एकदा अर्ज कोणतेही कारण न देता निकाली काढण्याचे सर्व अधिकार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांनी राखून ठेवले असून अधिक माहितीसाठी 02312665812 या दूरध्वनीवर संपर्क साधावा.
उपरोक्त सर्व पदे माजी सैनिक संवर्गातून निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरावयाचे आहेत माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास नागरी उमेदवारांचा विचार करण्यात येईल.


वाहन चालक
उत्तर द्याहटवाश्रीपती बंडा कांबळे
श्रीपती
उत्तर द्याहटवाश्रीपती बंडा कांबळे
हटवा