मुख्य सामग्रीवर वगळा

काय आहे अग्निपथ योजना ? अग्निपथ योजनेची संपुर्ण माहीती


 


परिवर्तनात्मक सुधारणा करताना केंद्रीय मंत्रिमंडळाने सशस्त्र दलांमध्ये तरुणांच्या भरतीसाठी ‘अग्निपथ’ योजनेला दिली मंजुरी

संबंधित सेवा कायद्यांतर्गत अग्निवीरांची चार वर्षांसाठी नोंदणी केली जाईल

तीन सेवा दलांमध्ये लागू असलेल्या खडतर मेहनत भत्त्यांसह आकर्षक मासिक पॅकेज

चार वर्षांचा प्रतिबद्धता कालावधी पूर्ण झाल्यावर अग्निवीरांना एक वेळचे ‘सेवा निधी’ पॅकेज दिले जाईल

यावर्षी 46,000 अग्निवीरांची भरती होणार आहे

भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सशस्त्र दलांमध्ये तरुण, तंदुरुस्त, वैविध्यपूर्ण प्रोफाइल असणे आवश्यक



भारतीय तरुणांना सशस्त्र दलात सेवा करण्यासाठी दाखल होता यावे यासाठी अग्निपथ या आकर्षक भरती योजनेला आज  केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजनेअंतर्गत निवडलेले युवक अग्निवीर म्हणून ओळखले जातील. देशभक्तीने प्रेरित या युवकांना चार वर्षांच्या कालावधीसाठी सशस्त्र दलात सामील व्हायची परवानगी या योजनेनुसार मिळणार आहे.

सशस्त्र दलांना अधिक सक्षम करण्यासाठी अग्निपथ योजनेची रचना करण्यात आली आहे. समकालीन तंत्रज्ञानाशी अधिक सुसंगत असलेल्या समाजातील तरुण प्रतिभांना आकर्षित करून कुशल, शिस्तबद्ध आणि प्रेरित मनुष्यबळ पुन्हा समाजात परत आणणारी ही योजना आहे. सैनिकांचा गणवेश परिधान करण्यास उत्सुक असलेल्या तरुणांना या योजनेद्वारे संधी मिळेल. सशस्त्र दलांतील तरुणांच्या संख्येत वाढ होऊन या दलांमध्ये नव्याने 'जोश' आणि 'जज्बा' तयार होईल त्याच वेळी अधिक तंत्रज्ञान जाणणाऱ्या युवकांच्या भरतीमुळे सशस्त्र दलांत काळानुरूप परिवर्तनशील बदल घडेल. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे भारतीय सशस्त्र दलांचे सरासरी वय अंदाजे 4-5 वर्षांनी कमी होईल. स्वयं-शिस्त, परिश्रम आणि लक्ष्य याची सखोल समज  असलेल्या प्रेरित तरुणांना, जे पुरेसे कुशलही आहेत आणि इतर क्षेत्रात योगदान देण्यास सक्षम आहेत अशा तरुणांच्या सशस्त्र दलातील अंतर्भावाचा फायदा राष्ट्रीय स्तरावर होईल. देशाला, समाजाला आणि देशातील तरुणांना या अल्प कालावधीच्या लष्करी सेवेचा मोठा  लाभ होणार आहे. यामध्ये देशभक्ती, सांघिक कार्य, शारीरिक तंदुरुस्ती वाढवणे, देशाप्रती दृढ निष्ठा वाढवण्यावर भर आहे. बाह्य धोके, अंतर्गत धोके आणि नैसर्गिक आपत्तींच्या काळात राष्ट्रीय सुरक्षा वाढवण्यासाठी प्रशिक्षित कर्मचार्यांसची उपलब्धता या योजनेद्वारे साध्य होईल.

लष्कराच्या तीन सेवांच्या मनुष्यबळ विकास धोरणात नवीन युग सुरू करण्यासाठी सरकारने सादर केलेली ही प्रमुख संरक्षण धोरण सुधारणा आहे. हे धोरण, तात्काळ लागू होईल. त्यानंतर तीन सेवांसाठी नावनोंदणी नियंत्रित करेल.

 

अग्निवीरांना लाभ


अग्निवीरांना तिन्ही सेवांमध्ये लागू असलेल्या जोखीम आणि खडतर मेहनत (hardship) भत्त्यांसह आकर्षक कस्टमाइज्ड मासिक पॅकेज दिले जाईल. चार वर्षांचा प्रतिबद्धता कालावधी पूर्ण झाल्यावर, अग्निवीरांना एकवेळचे ‘सेवानिधी’ पॅकेज दिले जाईल ज्यामध्ये त्यांचे योगदान त्यावरील जमा व्याज आणि त्यांच्या योगदानाच्या जमा झालेल्या रकमेइतके सरकारचे योगदान असेल ज्यामध्ये खाली दर्शविल्याप्रमाणे व्याज समाविष्ट असेल:



‘सेवानिधी’ला प्राप्तिकरातून सूट मिळेल. ग्रॅच्युइटी आणि सेवानिवृत्ती (पेन्शनरी) फायद्यांचा कोणताही हक्क असणार नाही. अग्निवीरांना भारतीय सशस्त्र दलातील त्यांच्या व्यस्त कालावधीसाठी 48 लाख रुपयांचे विना-सहयोगी जीवन विमा संरक्षण प्रदान केले जाईल.

राष्ट्रसेवेच्या या कालावधीत अग्निवीरांना विविध लष्करी कौशल्ये आणि अनुभव, शिस्त, शारीरिक तंदुरुस्ती, नेतृत्वगुण, धैर्य आणि देशभक्तीचे प्रशिक्षण दिले जाईल. चार वर्षांच्या या कार्यकाळानंतर, अग्निवीरांना नागरी समाजात समाविष्ट केले जाईल जिथे ते राष्ट्र उभारणी प्रक्रियेत ते मोठे योगदान देऊ शकतील. प्रत्येक अग्निवीराने मिळवलेले कौशल्य त्याच्या अनोख्या बायोडेटाचा भाग बनवण्यासाठी प्रमाणपत्रात समाविष्ट केले जाईल. अग्निवीरांनी त्यांच्या तारुण्याचा चार वर्षांचा कार्यकाळ  सेवेत पूर्ण केल्यावर, ते प्रौढ आणि स्वयंशिस्तबद्ध होतील. ते व्यावसायिक पातळीवर आणि वैयक्तिकरित्या अधिक चांगले नागरिक बनतील. अग्निवीर पुन्हा नागरी जगात आल्यानंतर त्यांच्या प्रगतीसाठी जे मार्ग उपलब्ध होतील आणि ज्या संधी मिळतील त्याचा फायदा राष्ट्र उभारणीसाठी होईल. समाजाच्या आर्थिकदृष्ट्या वंचित स्तरातील तरुणांवर आर्थिक दबाव असतो. अशा वंचित अग्निवीराला आर्थिक दबावाशिवाय (त्याच्या/तिच्या) भविष्यातील स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास अंदाजे रु. 11.71 लाखांचा सेवा निधी मदत करेल.

नियमित केडर म्हणून सशस्त्र दलांमध्ये नावनोंदणीसाठी निवडलेल्या व्यक्तींना पुढील किमान 15 वर्षांच्या कार्यकाळासाठी सेवा देणे आवश्यक आहे आणि ते भारतीय सैन्यातील कनिष्ठ आयोग अधिकारी/इतर पदांच्या विद्यमान अटी व शर्तींनुसार नियंत्रित केले जातील. वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार भारतीय नौदल आणि भारतीय हवाईदलामधील त्यांचे समतुल्य आणि भारतीय वायुसेनेमध्ये नावनोंदणी केलेले नॉन कॉम्बॅटंट असतील. या योजनेमुळे सशस्त्र दलातील तरुण आणि अनुभवी कर्मचारी यांच्यात सुदृढ संतुलन राखलं जाईल. त्यामुळे अधिक तरुण आणि तांत्रिकदृष्ट्या निपुण लढाऊ दल निर्माण होईल.

 

फायदे

  • सशस्त्र दलांच्या भरती धोरणात परिवर्तनकारी सुधारणा.
  • तरुणांना देशाची सेवा करण्याची आणि राष्ट्र उभारणीत योगदान देण्याची अनोखी संधी.
  • सशस्त्र दलांचे प्रोफाइल तरुण आणि गतिमान राहील
  • अग्निवीरांसाठी आकर्षक आर्थिक पॅकेज.
  • अग्निवीरांना सर्वोत्तम संस्थांमध्ये प्रशिक्षण देण्याची आणि त्यांची कौशल्ये आणि पात्रता वाढवण्याची संधी.
  • नागरी समाजात लष्करी नैतिकता असलेल्या चांगल्या शिस्तबद्ध आणि कुशल तरुणांची उपलब्धता.
  • समाजात परतणाऱ्या आणि तरुणांसाठी आदर्श म्हणून उदयास येऊ शकणाऱ्यांसाठी पुरेशा पुनर्रोजगाराच्या संधी.

 

अटी व शर्ती

अग्निपथ योजनेंतर्गत, अग्निवीरांची चार वर्षांच्या कालावधीसाठी संबंधित सेवा कायद्यांतर्गत नोंदणी केली जाईल. सशस्त्र दलात इतर कोणत्याही विद्यमान रँकपेक्षा वेगळी अशी त्यांची रँक असेल. चार वर्षांची सेवा पूर्ण केल्यावर, संघटनात्मक आवश्यकता आणि सशस्त्र दलांनी वेळोवेळी जाहीर केलेल्या धोरणांच्या आधारे, अग्निवीरांना सशस्त्र दलात कायमस्वरूपी नावनोंदणीसाठी अर्ज करण्याची संधी दिली जाईल. या अर्जांचा त्यांच्या चार वर्षांच्या व्यस्त कालावधीतील कामगिरीसह वस्तुनिष्ठ निकषांवर आधारित केंद्रीकृत पद्धतीने विचार केला जाईल आणि अग्निवीरांच्या प्रत्येक विशिष्ट तुकडीच्या 25% पर्यंत सशस्त्र दलाच्या नियमित केडरमध्ये नोंदणी केली जाईल. तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे स्वतंत्रपणे जारी केली जातील. ही निवड करणे हे सशस्त्र दलांचे विशेष अधिकारक्षेत्र असेल.

तीनही सेवांसाठी ऑनलाइन केंद्रीकृत प्रणालीद्वारे विशेष रॅलीजसह आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि राष्ट्रीय कौशल्य पात्रता संस्था अशा मान्यताप्राप्त तांत्रिक संस्थांच्या कॅम्पस मुलाखतींद्वारे नावनोंदणी केली जाईल. 'ऑल इंडिया ऑल क्लास' आधारावर नावनोंदणी केली जाईल आणि पात्रतेसाठी वय 17.5 ते 21 वर्षे दरम्यान असेल. सशस्त्र दलांमध्ये नावनोंदणीसाठी निर्धारित केलेल्या वैद्यकीय पात्रता अटींची पूर्तता अग्निवीरांना करायला लागेल. संबंधित श्रेणींसाठी वेगवेगळ्या अटी लागू होतील. अग्निवीरांची शैक्षणिक पात्रता विविध श्रेणींमध्ये नावनोंदणीसाठी प्रचलित राहील. {उदाहरणार्थ: जनरल ड्युटी (GD) शिपाई मध्ये प्रवेशासाठी, शैक्षणिक पात्रता इयत्ता 10 उत्तीर्ण आहे).


टिप्पण्या

महत्वाच्या भरती

भारतीय वायूसेना अग्निवीरवायु (Non-Combatant) भरती 2026 – संपूर्ण माहिती

  भारतीय वायूसेनेत Agniveervayu Non-Combatant पदासाठी 02/2026 बॅचची भरती जाहीर झाली आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत ही भरती 4 वर्षांच्या कालावधीसाठी केली जाते. खाली या भरतीची महत्त्वाची माहिती दिली आहे. पदाचे नाव अग्निवीरवायु (Non-Combatant) अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 फेब्रुवारी 2026 पात्रता (Eligibility) वय मर्यादा जन्म तारीख: 02 जुलै 2005 ते 02 जानेवारी 2009 (दोन्ही दिवस धरून) वैवाहिक स्थिती फक्त अविवाहित पुरुष उमेदवार पात्र 4 वर्षांच्या सेवाकाळात लग्न करता येणार नाही शैक्षणिक पात्रता 10वी (Matriculation) पास – मान्यताप्राप्त बोर्डातून शारीरिक व वैद्यकीय निकष किमान उंची: 152 सेमी छाती विस्तार: किमान 5 सेमी दृष्टी: 6/36 (Correctable to 6/9) LASIK/PRK शस्त्रक्रिया मान्य नाही ऐकण्याची क्षमता सामान्य असावी शरीर पूर्णपणे निरोगी असणे आवश्यक नोकरीचे काम (Job Profile) 1. Hospitality Stream स्वयंपाक, किचन व्यवस्थापन अन्न साठवण, सर्व्हिंग, स्वच्छता 2. Housekeeping Stream साफसफाई, बागकाम, पाणी भरणे कपडे इस्त्री, शू पॉलिश, छोटे दुरुस्ती काम अर्ज करण्याची प्रक्रिया अर्ज फॉर्म डाउनलोड करण्यासाठी य...

📮 इंडिया पोस्ट GDS भरती 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी

भारत सरकारच्या डाक विभाग (India Post) मार्फत Gramin Dak Sevak (GDS) भरती 2026 ची अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत 10वी पास उमेदवारांना परीक्षा न देता सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे. 28000+  जागांसाठी ही भरती असणार आहे  ही भरती संपूर्ण भारतभर विविध राज्यांमध्ये होणार असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 🏛️ भरती विभाग India Post – Department of Posts, Government of India 📌 भरतीचे नाव Gramin Dak Sevak (GDS) Recruitment 2026 📍 पदांचे नाव Branch Postmaster (BPM) Assistant Branch Postmaster (ABPM) Dak Sevak 🗓️ महत्वाच्या तारखा One Time Registration: 31 जानेवारी 2026 ते 14 फेब्रुवारी 2026 ऑनलाईन अर्ज व फी भरणे: 02 फेब्रुवारी 2026 ते 16 फेब्रुवारी 2026 Correction / Edit Window: 18 व 19 फेब्रुवारी 2026 🎓 शैक्षणिक पात्रता उमेदवार 10 वी (SSC) उत्तीर्ण असावा गणित व इंग्रजी विषय उत्तीर्ण असणे आवश्यक संबंधित राज्याची स्थानिक भाषा 10 वीपर्यंत शिकलेली असावी 🎂 वयोमर्यादा किमान वय: 18 वर्षे कमाल वय: 40 वर्षे 🎯 वय सवलत SC/ST – 5 वर्षे OBC –...

🚆RRB Group D भरती 2026

  🚆 RRB Group D भरती 2026 | CEN No. 09/2025 भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! Railway Recruitment Board (RRB) मार्फत Group D (Level–1) पदांसाठी CEN No. 09/2025 अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे देशभरात विविध रेल्वे झोनमध्ये एकूण 22,195 पदे भरली जाणार आहेत. 🔔 भरतीचा थोडक्यात आढावा भरती संस्था: Railway Recruitment Board (RRB) जाहिरात क्रमांक: CEN No. 09/2025 पदाचा स्तर: Level–1 (Group D) एकूण पदे: 22,195 पगार: ₹18,000/- (7th CPC Pay Matrix) नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 📅 महत्वाच्या तारखा 🟢 अर्ज सुरू: 31 जानेवारी 2026 🔴 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 मार्च 2026 (23:59) 💳 अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2026 ✏️ अर्ज दुरुस्ती कालावधी: 05 मार्च ते 14 मार्च 2026 🧑‍🦯 Scribe तपशील भरण्याची तारीख: 15 मार्च ते 19 मार्च 2026 🎓 शैक्षणिक पात्रता उमेदवार 10वी पास / ITI / Act Apprentice असणे आवश्यक आहे (पदानुसार). अंतिम निकाल लागलेला असणे आवश्यक आहे. Final Result प्रतीक्षेत असलेले उमेदवार अपात्र ठ...

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025 – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025 – संपूर्ण माहिती --- प्रस्तावना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) ही राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्त होण्यासाठी आवश्यक असलेली एक पात्रता परीक्षा आहे. ही परीक्षा केंद्र व राज्य सरकारच्या नियमावलीनुसार आयोजित केली जाते. सन 2025 मधील MAHATET परीक्षा संदर्भातील सर्व तपशील या लेखामध्ये दिलेले आहेत. --- 1. MAHATET म्हणजे काय? MAHATET (Maharashtra Teacher Eligibility Test) ही परीक्षा राज्यातील प्राथमिक (इ. १ ली ते ५ वी) आणि उच्च प्राथमिक (इ. ६ वी ते ८ वी) शिक्षक पदासाठी पात्रता मिळविण्यासाठी घेण्यात येते. शिक्षक पदासाठी अर्ज करण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. --- 2. परीक्षेचे आयोजन आयोजक संस्था: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे परीक्षेची तारीख: रविवार, 23 नोव्हेंबर 2025 पेपर I वेळ: सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 पेपर II वेळ: दुपारी 2.30 ते सायं 5.00 --- 3. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरुवात: 15 सप्टेंबर 2025 शेवटची तारीख: 3 ऑक्टोबर 2025 अर्ज कस...

NAPS Apprentice Registration 2025 – आवश्यक कागदपत्रे व संपूर्ण माहिती

  🛠️ NAPS Apprentice Registration 2025 – संपूर्ण माहिती 📌 प्रस्तावना भारत सरकारने युवकांना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात म्हणून राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना (NAPS) सुरू केली आहे. या योजनेतून विविध उद्योगांमध्ये उमेदवारांना Apprentice म्हणून प्रशिक्षण दिले जाते. उमेदवार शिकत असताना त्यांना मानधन (स्टायपेंड) देखील दिले जाते. --- 📑 नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे 1. आधार कार्ड 2. मोबाईल नंबर (OTP पडताळणीसाठी) 3. ई-मेल आयडी 4. पासपोर्ट साईज फोटो 5. सही / डिजिटल सिग्नेचर 6. बँक पासबुक / खाते तपशील (Aadhaar लिंक खाते) 7. शैक्षणिक प्रमाणपत्रे (10वी / 12वी / ITI / Diploma / Degree) 8. रहिवासी प्रमाणपत्र (काही प्रकरणांत आवश्यक) --- 👨‍🎓 पात्रता अटी उमेदवार भारतीय नागरिक असावा किमान वय: 14 वर्षे कमाल वय: ट्रेडनुसार बदलते शैक्षणिक पात्रता: काही ट्रेडसाठी 8वी उत्तीर्ण बहुतांशसाठी 10वी / 12वी उत्तीर्ण तांत्रिक (Technical) ट्रेडसाठी ITI / Diploma / Degree आवश्यक उमेदवाराकडे Aadhaar-लिंक बँक खाते असणे बंधनकारक --- 💰 स्टायपेंड (मानधन) Apprentice ला मासिक मानधन (स्टायप...