दहावी नंतर पुढे काय करावे असा प्रश्न पालक आणि विद्यार्थी या दोघांसमोर असतो. कोणता विषय घेऊन आपली पुढील शिक्षण पूर्ण करावे हे मात्र सर्वांपुढे मोठा प्रश्नचिन्ह असतो. कारण सगळ्यांना योग्य शैक्षणिक सल्ला मिळत नाही. तर आपण या लेखात दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर कोणते शिक्षण तुमच्यासाठी योग्य आहे हे जाणून घेऊयात.
गेल्या कित्येक वर्षापासून भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये एक गोष्ट सर्रासपणे चालत आली आहे, ती म्हणजे दहावीच्या परीक्षेत चांगल्या टक्क्याने यश मिळवले की पुढे विज्ञान शाखा घेणे आणि त्यांत डॉक्टर अथवा इंजिनियरिंग किंवा आयटी क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करणे. पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी चांगले टक्के आणि विज्ञान शाखा आहे हे जणू समीकरणच बनले होते. त्यामुळेच आज भारतात किती तरी इंजीनियरिंग कॉलेज आहेत. त्यात थोडा बदल झालेला दिसून येतोय, विद्यार्थीही वाणिज्य तसेच कला क्षेत्राकडे वळत आहेत. दहावी नंतर तुमच्या गुणवत्तेच्या आधारावर किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही विज्ञान, वाणिज्य ,कला यातील एक शाखा निवडता.
दहावी नंतर आपल्याला विज्ञान शाखेत,वाणिज्य शाखेत व कला शाखेत तसेच अभियांत्रिकी डिप्लोमा व आयटीआय यामध्ये करियर करता येऊ शकते. या लेखात आपण वरील सर्व क्षेत्रांची संपूर्ण व सविस्तर माहिती पाहणार आहोत.
1. विज्ञान शाखा (Science)
विज्ञान शाखेत दोन विभाग असतात त्यामध्ये पी सी एम आणि पी सी बी, यापैकी एक विभाग विद्यार्थी निवडू शकतो.
पीसीएम (PCM)म्हणजे काय
*फिजिक्स (Physics)
*केमिस्ट्री (Chemistry)
*मॅथेमॅटिक्स (Mathematics)
पी सी बी (PCB) म्हणजे काय
*फिजिक्स (physics)
*केमिस्ट्री (chemistry)
*बायोलॉजी (biology)
ही मुख्य विषय विज्ञान शाखेमध्ये असतात विज्ञान शाखा घेऊन तुम्ही पुढील क्षेत्रात शिक्षण घेऊ शकता आम्ही काही ठराविक क्षेत्राबद्दल पुढे माहिती दिली आहे.
1. बॅचलर ऑफ सायन्स B.sc
2. बॅचलर ऑफ आयटी BSc IT
3. बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स Bsc. CS
4. मेकॅनिकल इंजिनिअरिंग Mecanical Engineering
5. इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग electical engineering
6. सिविल इंजीनियरिंग civil engineering
7. टेक्स्टाईल इंजीनियरिंग textile engineering
8. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी B.tech
9. बॅचलर कॉम्प्युटर ऍप्लिकेशन B.C.A
10.डिप्लोमा एज्युकेशन D.ed
11.बॅचलर बिझनेस स्टडीज B.B.S
12. बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज B.M.S
13. डिप्लोमा इन फार्मसी D.Farm
14. बॅचलर ऑफ इंटेरियर डिझाइनिंग B.I.D
15. कमर्शियल पायलट ट्रेनिंग Flying Trenning
16. आर्किटेक्चर बॅचलर B.Arch
17. बॅचलर ऑफ सायन्स B.sc
18. बॅचलर ऑफ आयटी BSc IT
19. बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स Bsc. CS
अशाप्रकारे आपण विज्ञान शाखा निवडून आपले करियर करू शकता.
वाणिज्य शाखा (Commers)
वाणिज्य शाखा निवडण्या आधी तुम्हाला हेही माहीत असणे आवश्यक आहे, की त्या शाखेमध्ये कोण कोणत्या विषयांचा समावेश आहे, तर वाणिज्य शाखेमध्ये पुढील विषयांचा समावेश असतो.
1. अकाउंटन्सी (accountancy)
2. इकोनॉमिक्स (economics)
3. बिझनेस स्टडीज (Bussines Studies)
4. मॅथेमॅटिक्स (Mathematics)
5. इंग्लिश (English)
वाणिज्य अर्थात कॉमर्स शाखेमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्ही पर्चेसिंग व स्टोअर कीपिंग, मार्केटिंग व सेल्समन, अकाउंटिंग अंड ऑडिटिंग ,ऑफिस मॅनेजमेंट ,इन्शुरन्स, बँकिंग इत्यादी क्षेत्रात करिअर करू शकता.
काही पर्याय पुढीलप्रमाणे
1. बेस्ट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज B.M.S
2. बॅचलर ऑफ कॉमर्स. B.Com
3. बॅचलर ऑफ अकाउंट अँड फायनान्स. B.A.F
4. बॅचलर ऑफ बिझनेस स्टडीज. B.B.S
5. व्यवसाय प्रशासन मधील मास्टर. M.B.A
6. बॅचलर ऑफ एज्युकेशन B.Ed
7. आयसीडब्ल्यूए I.C.W
8. बॅचलर इन लायब्ररी सायन्स. B.L.S
9. इम्पोर्ट एक्सपोर्ट डिप्लोमा
इत्यादी.
कला शाखा (Arts)
जर तुम्हाला कला शाखेची आवड आहे, आणि तुम्हाला या शाखेमध्ये पुढील शिक्षण पूर्ण करायचे असेल, तर या शाखेमध्ये कोणकोणत्या विषयांचा अभ्यास करावा लागतो. ते विषय खालील प्रमाणे...
1. हिस्टरी (History)
2. इंग्लिश (English)
3. जिओग्राफी (Geography)
4. पॉलिटिकल सायन्स (political science)
5. इकॉनॉमिक्स (Ecomomics)
6. सायकॉलॉजी (Psychology)
7. सोसिओलॉजी (Sociology)
तुम्ही पुढे जाऊन फर्निचर अंड इंटरियर डिझाईनिंग , मेक अँड ग्लास डिझायनिंग ,ग्राफिक डिझाईन, ॲनिमेशन, व्हिडिओ कम्युनिकेशन, ट्रॅव्हल अँड टुरिझम, बेकरी व कन्फेक्शनरी म्युझिक ,कल्चर ,होम सायन्स इत्यादी मध्ये करू शकता यासाठी दोन विभाग आहेत aplied आर्ट्स आणि फाईन आर्टस्.
कला शाखेतून काही शिक्षणाचे पर्याय आहेत तुम्ही करत होता ते पुढील प्रमाणे.
1. बॅचलर ऑफ आर्ट्स. (B.A)
2. बॅचलर ऑफ मॅनेजमेंट सायन्स (B.M.S)
3. बॅचलर ऑफ फाइन आर्ट (B.F.A)
4. बॅचलर ऑफ सोशल वर्क (B.S.W)
5. लॉ कोर्स (B.A +LLB)
6. बॅचलर ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट (B.E.M)
7. बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (B.B.A)
डिप्लोमा (Diploma)
सध्या दहावी नंतरचे डिप्लोमा कोर्स हे विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाले. आहेत कारण यात बारावी पूर्ण करता महाविद्यालयात विद्यार्थ्यांची नोंदणीची संधी उपलब्ध करून दिली जाते .दहावीनंतर पदविका अभ्यासक्रम उद्योग केंद्र आहेत आणि संबंधित क्षेत्रात विद्यार्थ्यांना योग्य ते प्रशिक्षण देतात ,ते त्यांना नोकरी शोधणे अधिक सोपे होईल त्याचा तुम्हाला डिप्लोमा करायचा असेल तर तुम्हाला आधी ठरवावे लागेल ते तुम्हाला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे.
डिप्लोमाचे शिक्षण घ्यायचे असल्यास पुढील काही पर्याय तुम्हाला विचारात घेता येऊ शकतात.
1. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा
2. डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरिंग
3. केमिकल रसायनशास्त्र इंजीनियरिंग डिप्लोमा
4. डिप्लोमा इन टेक्नॉलॉजी
5. डिप्लोमा इन आर्किटेक्चर
6.मेडिकल सायन्स मध्ये डिप्लोमा
7.कम्प्युटर सायन्स
8. कृषी पदविका
9. डिप्लोमा इन फॅशन टेक्नॉलॉजी
10. डिप्लोमा फॅशन डिझाईन.
या शिवाय तुम्ही प्रोग्रामिंग मध्ये सुद्धा करिअर करू शकता यात पुढील पर्याय उपलब्ध आहेत
1. ग्राफिक्स डिझायनिंग
2. सर्टिफिकेट कोर्स इन डिझायनिंग
3. सर्टिफिकेट कोर्स इन प्रोग्रामिंग लैंग्वेज
4. सायबर सुरक्षा आणि इथिकल हॅक
या व्यतिरिक्त डिप्लोमा इन फुड अंड बेवरेज केटरिंग, आणि हॉटेल प्रशासनात डिप्लोमा, डिप्लोमा इन बेकरी मध्ये डिप्लोमा ,कंटेंट रायटिंग डिप्लोमा.
आयटीआय ITI
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर बरेच विद्यार्थी आयटीआय कोर्सेस करतात कारण यामध्ये तुम्हाला कमी वेळेमध्ये चांगले प्रशिक्षण आणि नोकरीच्या संधी सुद्धा उपलब्ध होतात. आयटीआय त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार विविध कोर्सेस उपलब्ध आहेत. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आपले चित्र निवडू शकता.
काही लोकप्रिय कोर्सेस खालील प्रमाणे आहेत
1. टर्नर
2. फिटर
3. मेकॅनिकल
4. इलेक्ट्रिशन
5. इलेक्ट्रॉनिक्स
6. प्लंबर
7. वेल्डर
..............
नवीन सरकारी नोकरीच्या जाहीराती साठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा