PM किसान सन्मान निधी मध्ये नोंदणी असलेले शेतकऱ्यांचा 14 वा हफ्ता आधार लिंक बँकेत जमा झाले आहे. पण अजुन बऱ्याच शेतकऱ्यांचे पेमेंट प्रोसेस मध्ये आहे.
PM किसान योजनेमधे जे शेतकरी रजिस्टर आहेत त्याना वर्षाला 6 हजार रुपये मानदन मिळते. पण काही कारणास्तव हे हप्ते बंद झाले असतिल तर काय कारण आसु शकते ते आज आपण पाहणार आहोत.
PM किसान योजनेचे हप्ते बंद होण्याची कारणे व उपाय -
1. KYC केली नसेल तर -
KYC केली नसेल तर आपले मिळणारे मानधन बंद होते. आधार कार्ड पी.एम किसान पोर्टल ला लिंक करणे बंदणकारक आहे. हे आपण आपल्या जवळच्या CSC सेंटर मध्ये जाऊन करु शकतो. मोबाईल OTP द्वारे किंवा बायोमेट्रीक द्वारे आपण EKYC करू शकतो.
2. बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर -
आपले बँक खात्याला आधार कार्ड जर लिंक नसेल तर आपल्याला मिळणारा ह्फ्ता बंद होतो कारण जे मानधन मिळनारे आहे ते आपल्या बँक ला आधार लिंक असलेल्या खात्यात च जमा होते. म्हणुन बँकेत जाऊन आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घेणे.
3. शेती (७/१२ व ८अ) मध्ये बदल केला असेल तर -
आपल्या शेती मध्ये जर कोणताही बदल केला असेल म्हणजे शेती वाटणी करणे , म्हणजे आपल्या ८ अ उतार्या वर बदल झाला असेल तर आपले मानधन बंद होते. किंवा आपल्या आधार कार्ड वरील नाव व शेती उतार्या वरील नाव वेग़ळे असेल तर आपले मानधन बंद होते. शेती मध्ये कोणताही बदल असेल तर कृषी विभागाशी संपर्क साधावा.
वरील सर्व कारणे पूर्ण असतील तरीही आपले पेमेंट आले नसेल. तर हे पेमेंट प्रोसेस मध्ये असू शकते. यासाठी काही दिवस वाट पाहावी किंवा संबधित कृषी विभागाशी संपर्क साधावा.
PM किसान सन्मान निधी योजनेची स्थिती (स्टेटस) कसा पहावा याची माहिती खाली दिली आहे.
PM किसान Status चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा