मुख्य सामग्रीवर वगळा

पोलीस व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र /चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (कॅरेक्टर सर्टिफिकेट) आवश्यक कागदपत्रे

👉पोलीस व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र /चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (कॅरेक्टर सर्टिफिकेट) साठी आवश्यक असणारे कागदपत्रे आज आपण पाहणार आहोत.



पोलीस व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र /चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (कॅरेक्टर सर्टिफिकेट) मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो ऑनलाइन अर्ज केल्यानंतर सदर अर्ज आपल्या लोकल पोलीस स्टेशनमध्ये जातो त्या ठिकाणी अर्जदाराने भरलेला फॉर्म त्याला जोडलेली कागदपत्रे याची पडताळणी केली जाते आणि तसेच सदस्यावर काही गुन्हा दाखल झाले आहेत की नाही याची शहानिशा केली जाते त्यानंतर अर्ज संबंधित पोलीस अधीक्षक कार्यालय किंवा पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयात पाठवला जातो त्यानंतर आपल्या अर्जाची त्या ठिकाणी  पडताळणी होऊन सर्व योग्य असल्यास आपल्या अर्जाला मंजुरी मिळते व आपला अर्ज ऑनलाईन डाउनलोड करता येतो.

पोलीस व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र मिळण्यासाठी आवश्यक कागदी कोणते आहेत

पोलीस व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र मिळण्यासाठी मुख्यतः ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, वयाचा पुरावा आणि आपण जिथे हे प्रमाणपत्र सादर करणार आहोत त्या संस्थेचे किंवा कॉलेजचे पत्र, भरतीसाठी पोलीस पाटील दाखला

 ओळखीचा पुरावा

1 आधार कार्ड 

2 पॅन कार्ड 

3 ड्रायव्हिंग लायसन 

4 मतदान कार्ड 

5 पासपोर्ट विद्यार्थ्यांची ओळखपत्र

वरीलपैकी किमान एक कागदपत्र आवश्यक आहे

 पत्त्याचा पुरावा

1 रेशन कार्ड 

2 लाईट बिल 

3 फोन बिल 

4 भाडे करार 

5 पासपोर्ट

वरीलपैकी किमान एक कागदपत्र आवश्यक आहे

 वयाचा पुरावा

1 जन्म दाखला 

2 बोर्ड सर्टिफिकेट 

3 शाळा सोडल्याचा दाखला

पुढीलपैकी किमान एक कागदपत्र जोडणे आवश्यक आहे

इतर कागदपत्र

1 अर्जदाराचा फोटो 

2 अर्जदाराची सही 

3 कंपनीचे पत्र


अर्ज कसा करावा

पोलीस वेरिफिकेशन साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागतो त्यासाठी सर्व कागदपत्रे घेऊन जवळील सीएससी सेंटर किंवा नेट कॅफेमध्ये जाऊन अर्ज करावा.



टिप्पण्या