👉 पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करणे 30 जून 2023 पर्यंत बंधनकारक होते ज्यांनी अजूनही पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक केलेले नाही अशा पॅन कार्ड धारकांची पॅन कार्ड Inoperative (बंद) झाली आहेत. अशा पॅन कार्ड धारकांना ते पॅन कार्ड परत चालू करण्यासाठी 1000 रूपये विलंब शुल्क भरून पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करू शकतात.
पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपण एक लिंक दिली आहे ती लिंक या लेखाच्या शेवटी आपल्याला पाहायला मिळेल तसेच आपले पॅन कार्ड Verified आहे का Inoperative आहे हे सुद्धा यामध्ये समजेल.
👉पॅन कार्ड आधार कार्ड लिंक नाही केली तर काय नुकसान होऊ शकते ते आपण आज पाहणार आहोत.
1. पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक नसेल तर बँकेत नवीन खाते काढण्यासाठी अडचण येऊ शकते. त्यासाठी आपले पॅन कार्ड चालू असणे गरजेचे आहे ते पॅन कार्ड जर inoperative असेल तर कोणत्याही बँकेत नवीन खाते निघणार नाही.
2. गुंतवणूक करण्यासाठी अडचण येऊ शकते. कोणत्याही बँकेत किंवा म्युचल फंड मध्ये आपल्याला गुंतवणूक करण्यासाठी पॅन कार्ड हे बंधनकारक असते.
3. कोणत्याही प्रकारची एफडी असेल तर ती आपल्याला काढता येऊ शकत नाही. त्यासाठी आपले पॅन कार्ड चालू स्थितीत पाहिजे.
4. बँकेत ट्रांजेक्शन करण्यासाठी अडचण येऊ शकते.
5. ऑनलाइन ट्रांजेक्शन करण्यासाठी अडचण येऊ शकते.
6. कोणत्याही अकाउंटला पॅन कार्ड केवायसी करण्यासाठी अडचण येऊ शकते.
7. PF खात्याला पॅन कार्ड KYC केल्याशिवाय रक्कम withdraw करता येत नाही.
8. प्रॉपर्टी खरेदी करताना अडचण येऊ शकते. आपले पॅन कार्ड जर बंद असेल तर कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी खरेदी करता येऊ शकत नाही.
9. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी पॅन कार्ड चालू असणे आवश्यक आहे. जर नसेल तर शेअर मार्केट मध्ये व्यवहार करण्यासाठीं समस्या येऊ शकते.
10. कोणत्याही प्रकारचा विमा (इन्शुरन्स) करण्यासाठी पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. पॅन कार्ड शिवाय विमा करता येऊ शकत नाही. म्हणून आपले पॅन कार्ड चालू स्थितीत पाहिजे.
11. सरकारी किंवा खाजगी नोकरी करणाऱ्याना तर पॅन कार्ड चालू स्थितीत असणे बंधनकारक आहे. तसेच नोकरी बदली मध्ये सुद्धा समस्या येऊ शकते.
12. कोणत्याही प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी समस्या येऊ शकते.
13. नवीन गाडी खरेदी करण्यासाठी अडचण येऊ शकते. पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक नसेल तर नवीन गाडी खरेदी करता येऊ शकत नाही.
14. पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक नसेल तर क्रेडिट कार्ड मिळू शकणार नाही.
15. लोन प्रोसेस करण्यासाठीं समस्या येऊ शकते. आपले पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक नसेल तर कोणत्याही बँकेत किंवा फायनान्स कंपनी मध्ये कर्ज काढण्यासाठी अडचण येऊ शकते.
16. ट्रेडिंग करण्यासाठी डिमॅट खाते असणे आवश्यक असते. जर आपले पॅन कार्ड आधार कार्ड लिंक नसेल तर डिमॅट खाते निघणार नाही.
17. 50 हजार च्या वरील रक्कम देणे किंवा घेणे साठी अडचण येऊ शकते. बँकेत 50 हजार च्या पुढील रक्कम भरण्यासाठी किंवा काढण्यासाठी अडचण येऊ शकते
18. चेक किवा ड्राफ्ट प्रोसेस करण्यासाठीं समस्या येऊ शकते.
19. या शिवाय बरेच असे काम आहेत की जे पण कार्ड शिवाय करू शकत नाही. म्हणून आपले पॅन कार्ड चालू स्थितीत असणे गरजेचे आहे. म्हणून पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक करून घेऊन या येणाऱ्या सर्व समस्या येणार नाहीत.
पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्यासाठी आता 1000 रुपये शुल्क आहे. ही शुक्ल इन्कम टॅक्स च्या official Website वर भरावी लागते.
पॅन कार्ड ला आधार लिंक आहे की नाही हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
पॅन कार्ड Verified आहे काय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पॅन कार्ड आधार कार्ड लिंक कसे करावे
पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्यासाठीं जवळील महा ई सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र , सायबर कॅफे/ नेट कॅफे मध्ये जाऊन आपण पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करू शकतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा